सर्वात श्रीमंत महापालिकेच्या प्राणीदहनाच्या ‘शुल्का’च्या निर्णया विरोधात प्राणीप्रेमींकडून

नाराजीचा सूर. 

निसर्ग चक्रातील प्राण्यांसाठी विविध योजना राबवायची सोडून मृत्यू नंतरही आकारला जाणार

” १ हजारचा टोल.”

जैव विविधता संगोपनासाठी तरतूद?

पिंपरी,दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत नेहरुनगर , पिंपरी येथे पाळीव प्राणी ( कुत्रा , मांजर ) दहन मशिन ( Pet incinerator ) स्थापित करण्यात आलेली आहे . त्यामध्ये मन २०१६ पासुन आजतागायत शहरातील नागरिकांना त्यांचे मृत पाळीव प्राणी निःशुल्क दहन करण्याची सुविधा उपलब्ध होती .

मात्र आता स्थायी समिती सभा (दि.२१ /१/२१) ठरावानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तसेच हद्दी बाहेरील छोटे पाळीव प्राणी ( कुत्रा व मांजर ) यांच्या दहन शुल्कांची रक्कम रुपये १००० / – ( प्रति प्राणी) इतकी आकारण्यास मान्यता घेण्यात आली आहे . त्यानुसार दि . ०१/०४/२०२१ पासुन प्राण्यांकरीता दहन शुल्क र.रु. १००० / – इतके आकारण्यात येईल .

मात्र अगोदरच मृत प्राणी दहनाविषयी अनास्था असलेले नागरिक तब्बल १हजार रूपये देणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनायक बडदे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की,  पशु- प्राणी पाळणारे फक्त श्रीमंत नागरिक नसून सर्व  सामान्य नागरिकही प्राण्यांचे संगोपन करतात. काही ठिकाणी भटक्या प्राण्यांना आसरा देवून काळजी घेणारेही प्राणीमित्र आहेत त्यांना हे मृत प्राणी दहन शुल्क एक हजार रुपये अधिक आहे. 

तसेच बऱ्याच वेळा हौस म्हणून प्राणी पाळणारे नागरिक प्राणी आजारी पडल्यास त्याला रस्त्यावर सोडून देतात. अशा प्राण्याचा मृत्यू झाल्यास दहनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 

तर प्राणी मित्र संघटनेचे कुणाल यांनी सांगितले की, इतर शहरात प्राण्यांच्या साठीही विविध योजना राबवल्या जातात मात्र पिंपरी चिंचवड शहरात तशा पद्धतीने प्रत्यक्षात प्राण्यांसाठी योजना राबवायची सोडून असे निर्णय घेतले जाणे म्हणजे प्राण्यांच्या मरणातही व्यावसायीक दृष्टीकोन ठेवण्याचा प्रकार आहे. 

 

Comments are closed

error: Content is protected !!