पुणे,दि.३( punetoday9news):- जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी ) पहाटे कोरोनामुळे निधन झाले . सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्यचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती .

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांनी सरग यांच्या प्रकृतीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले . मनमिळावू , सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता . त्यांच्या निधनामुळे माहिती खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . सरग यांचा माध्यम क्षेत्राशी मोठा संपर्क होता . सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते .

मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले . त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली . शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही . अखेर त्यांचे निधन झाले.

अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली .

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!