पंढरपूर,दि.१२( punetoday9news):- देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे . महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे . त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे. महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे , अशा घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते . यावेळी प्रचारसभेतून जनतेशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली .

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे . दुर्दैवाने ही पोटनिवडणूक लागली आहे . एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे , असे सांगतानाच देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे . सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे . मात्र ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे . त्यामुळेच लॉकडाऊन केला जात आहे . कष्टकरी , शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे . यास आमचा विरोध राहील. असे ते म्हणाले.

Comments are closed

error: Content is protected !!