पुुुणे,दि.१४(punetoday9news):- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा. ईश्वर ढमढेरे यांनी व्याख्यानाद्वारे मांडलेले विचार.
भारतातील सर्वसामान्य जनतेत रुजलेली,अंधश्रद्धा ,
अस्पृश्यता, अज्ञान ,पारतंत्र्य, मानसिक,सामाजिक गुलामी मुळे निर्माण झालेली हतबलता आणि बदलते राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय वारे ..या झंझावातात डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाची ज्योत कशी प्रज्वलित होत गेली,
अनेक विद्या शाखेत पारंगत होत त्यांनी आकाशाला कशी गवसणी घातली, आणि भारताला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळुन उपयोग नाही येथील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक आर्थिक ,वैचारिक, भावनिक ,धार्मिक अशा सर्वच दृष्टीने स्वातंत्र्य ,मिळायला हवे. उच्च नीचतेचे समूळ उच्चाटन व्हायलाच हवे. सर्वाना समान हक्क मिळायला हवेत आणि सर्व भारतीयांना अस्मितेची जाणीव व्हायला हवी यासाठी प्रस्थापितांशी कसा लढा दिला. त्या संघर्षमय जीवनाचा सत्य आलेख परखड भाषेत, निर्भीडपणे ,
तपशीलासह मांडला आहे.
ते म्हणाले की, स्वप्नातील भारताला मूर्त स्वरुप देणाऱ्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे सुरु झाले नंतर कुटुंबाचे स्थलांतर मुंबईला झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मट्रिक पर्यंतचे शिक्षण या St एल्फीस्टँन हायस्कूल येथे झाले.
या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असून ही,10 ×10 च्या खोलीत राहून अभ्यास केला. आज काळ बदलला आहे..काही सधन कुटुंबातील मुले ही सोय उपलबध असून शिकत नाहीत,हे दूर्दैव आहे..! मुलांमधील प्रगल्भता कमी होत आहे. वंचित घटकांंना कशी मदत करता येइल याचाही सध्या कोणी फारसा विचार करीत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड महाराज यांनी दिलेल्या 25 रु. शिष्यवृत्ती च्या आधारावर कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आणि दररोज 18 ते 20 तास असा अभ्यास केला की गेल्या शंभर वर्षातील या विद्यापिठातील हुशार ,विद्वान विद्यार्थ्यांच्या यादीतील ते सर्वोत्तम विद्यार्थी आहेेत.
त्यांच्या अभ्यासातिल एकाग्रते विषयी प्रसंग सांगताना म्हणाले की, लायब्ररी तील कर्मचाऱ्याने रात्री घरी जाताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जेवणाचा डबा त्यांच्या जवळ ठेवला,अभ्यास झाला की जेवा असे सांगितले आणि घरी गेला .सकाळी आल्यावर त्याने पाहिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचतच होते. शेजारी डबा तसाच होता. सेवक म्हणाला “हे काय? तुम्ही अजून जेवले नाही?”
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,” अरे तू अजून घरी गेला नाहीस…?”
काय ही तल्लीनता…प्रचंड ध्यास! आज ही प्रत्येक विद्यार्थ्यापुढे असलेला आदर्श विक्रम !…’आणि यशाचा मूळ मंत्र!!
अमेरीकचे प्रख्यात शिक्षण तज्ञ आणि थोर तत्वज्ञ,ज्यांच्या तत्व प्रणालीवर आज अभ्यासक्रम चालतो ते जॉन ड्युई म्हणाले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सारखा हुशार विद्यार्थी मी अन्य कोठे पाहिला नाही…” हे एकच वाक्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दशेतील सामर्थ्याची प्रचिती देते. आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपुढे दिपस्तंभ उभा करते .आणि सांगते की अरे ,भरमसाठ फी भरुन मोठमोठ्या शाळेत जा किंवा सरकारी शाळेत जा पण पुस्तकांच्या मदतीने असा अभ्यास करा की हुशार आणि व्यासन्गी विद्यार्थी म्हणून कधी तरी तुमचे ही नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर घेतले जाईल.
त्यासाठीच अभ्यासायचा आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष!
1920 मध्ये मूक नायक हे वर्तमानपत्र सुरु केले , भारतातील अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठविला अंध श्रद्धातून मुक्त होण्याचे आव्हान केले..सोशित पिडीत समाजासाठी त्यानी केलेले कार्य विश्वाला प्रेरणा दायक आहे म्हणून ते विश्वरत्न ‘ आहेत.!
छत्रपती शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्म्य जाणले होते म्हणूनच मूक नायक साठी त्यानी 2000 रुपये दिले होते!
राजे असुनही शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटायला मुंबई ला गेले. त्यामुळे आश्चर्य वाटुन डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “तुम्ही कशाला आलात महाराज ..?” मला बोलवायचे होते . छ. शाहू महाराज म्हणतात, .”आम्ही मानाचे राजे,तुम्ही ज्ञानाचे राजे ” आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर बिघडले कुठे..?”
असे या दोघांचे ऋणानुबंध होते!हे आज लक्षात घेतले पाहिजे! पुढे बहुजनांच्या विकासासाठी, शिक्षणाच्या प्रसारा साठी सोलापुर मध्ये पाच वसतिगृह सुरु केले, भारतीय जाती व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला कास्ट इन इंडिया या पुस्तकात सविस्तर माहिती दिली, आणि माणसाला माणुसकी असते , जात
नसते हे भगवान बुद्धाचे विचार अंगिकारले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 65 वर्षां चे आयुष्य लाभले पण सगळा काळ सतत कार्य करण्यात गेला,संघर्षात गेला,समानता प्रस्थापनात व्यतीत झाला..!
बहुजन हिताय बहुजन सुखाय हा त्यांच्या पुर्ण जीवन कार्याचा व लढ्याचा समान धागा आहे.
“शिका संघटीत व्हा, न्यायासाठी, हक्कासाठी, समानते साठी संघर्ष करा.” हा संदेश दिला .
Comments are closed