दापोडी,दि.१(punetoday9news):- कोरोना काळात कामगारांनी नागरिकांची काळजी घेऊन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विशेष कामगिरी केल्याबद्दल आशा कामगारांचा उत्कृष्ट गुणवंत कामगार गौरव पुरस्कार २०२१ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
आनंद कांबळे, नंदकुमार भालेराव, मोहन साबळे, भास्कर वनम, मंदा जाधव, सविता जाधव, रवी शिंदे, संदिप राठोड या कामगारांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून संदीप गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याचबरोबर कोरोना महामारी मध्ये कामगारांना अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून अन्नधान्य वाटप करण्यात आले. आपल्या कुटुंबातील सदस्याला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो व उल्लेखनीय कामगिरी करत़ो असे मत संदिप गायकवाड यांनी व्यक्त केले.
कामगार हा नेहमीच समाजासाठी काही तरी कामं करून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो आज कोरोना प्रादुर्भाव असतानाही कर्मचारी आपली व परिसराची काळजी घेतात.
यावेळी नितीन गायकवाड, राम उप्पार, गिरीश घाडगे मनसुर नदाफ व विशाल जाधव उपस्थित होते.
Comments are closed