पिंपरी, दि. ५(punetoday9news):- ‘आपला परिवार’ , ‘चला मारु फेरफटका’ आणि ‘जुन्नर तालुका मित्र मंडळ,पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या सोमतवाडी, लेण्याद्री, चाळकवाडी, ओझर येथे असलेल्या कोवीड सेंटरला ऑक्सिमिटर, थर्मोमिटर, सॅनिटायझर स्टँड, मास्क, फाॅगिंग मशिन, वाँटर हिटर, वेपोरायझर आणि १०० पी.पी.ई.किट सुरक्षा साहित्य अशी मदत केली.
या प्रसंगी आपल्या परिवाराचे अध्यक्ष मैत्री भुषण एस.आर.शिंदे, किरण कांबळे,श्रीकांत कदम, सचिन गावडे तसेच निसर्ग अभ्यासक, शिवनेरी भुषण रमेश खरमाळे, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, कोषाध्यक्ष दिपक सोनवणे, पोलीस पाटील कविता बिडवाई आणि लेण्याद्री गणपती ट्रस्टचे ट्रस्टी गाडे
उपस्थित होते.
या वेळी एस आर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “आपला परिवार” आणि “चला मारू फेरफटका,पुणे” या संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या मदतीचा सदुपयोग झाला असुन मागील सात वर्षांपासून आम्ही ‘ऋण समाजाचे’ या सदराखाली प्रत्येक जण सढळ हाताने ‘एक हात मदतीचा’ देत समाजाची बांधिलकी जपत आलो आहोत. असे मत व्यक्त केले.
आपल्या आयुष्यातील एक क्षण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यात जावा ही निखळ भुमिका सदस्यांची आहे. डॉक्टर हे या काळातील खरे कोरोना योध्दा असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. कारण डॉक्टर सुरक्षित राहीले तरच कोरोना रूग्ण सुरक्षित राहतील.
दिपक सोनवणे यांनी मंडळाच्या वतीने मागील वर्षांपासून सामाजिक कार्यासाठी दीड लाख रुपयांची मदत केली असुन या पुढेही अशीच मदत करत राहू अशी ग्वाही दिली.
Comments are closed