मुंबई,दि.९(punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या वाढत्या दबावाने आणि विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेवून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अनुकरण करत राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पंधरा दिवस झाले तरीही अद्याप विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याबाबत शिक्षण विभागाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे दिसत नाही.
त्यामुळे अकरावीसोबतच इतर अभ्यासक्रमांचे पुढील शैक्षणिक वर्ष कसे चालणार का यंदाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष रखडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे .
सीबीएसई’ने परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केल्यानंतर पालकांच्या मागणीपुढे नमते घेत राज्याच्या शिक्षण विभागानेही राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. ‘सीबीएसई’ने त्यांच्या मूल्यमापनाचे सूत्र जाहीर करून त्याची शाळांनी अंमलबजावणीही सुरू केली.
राज्यात मात्र, निर्णय जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन कसे करणार याबाबत विचार करण्यात आला नाही. आता निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवस झाले तरीही शिक्षण विभाग अद्याप विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि पुढील प्रवेश प्रक्रिया कशी करावी याचा निर्णय जाहीर करू शकलेला नाही. परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यमापन कसे करावे याबाबतच्या उपायांची चाचपणी करणारा अद्यापही निष्कर्षाप्रत पोहोचलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढलेलाच आहे. परंतु पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक यंदाही कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments are closed