पिंपरी,दि.२४( punetoday9news):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे दि. 14 मे ते 23 मे पर्यंत शहरातील विविध भागात अन्नदान करण्यात आले. सध्या चालू असलेल्या कोरोना महामारी च्या काळात अनेक रेल्वे स्टेशन वरील लोकांची उपासमार होत असून त्याची पाहणी करता महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख व संचालक निवृत्ती काळभोर यांच्या संकल्पनेतून अन्नदान उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाकरिता महामंडळाचे सचिव महादेव फपाळ यांनी मदतीचे आवाहन केले होते.
अन्नदानाकरिता अनेक क्रीडा शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला एवढेच नव्हे तर क्रीडा शिक्षकांच्या मुलांनी देखील यात खारीचा वाटा उचलला आहे. तसेच मुख्याध्यापक संत साई हायस्कूल भोसरी चे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी देखील या उपक्रमात मोठ्या प्रमाणात फळे देऊ केली तसेच मुख्याध्यापक निलेश गायकवाड, सुहास तोहगावकर, विजया फडणीस ,भोसले मॅडम यांनी देखील मदतीचा हात पुढे केला. महामंडळाच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी आकुर्डी रेल्वे स्टेशन ,चिंचवड पिंपरी ,कासारवाडी, दापोडी रेल्वे स्टेशन, फुलेनगर ,चर्चगेट, आंबेडकर पुतळा अशा विविध ठिकाणी रोज जाऊन अन्नदानाचे वाटप केले.
किर्ती मोटे आणि रमेश कुदळे यांनी क्रीडा शिक्षकांनी या उपक्रमामध्ये दही वाटप केले. तसेच स्नेहा कुंदप यांनी मास्क व कपडे वाटप केले. तर राम मुदगल यांनी सुध्दा कपड्याचे वाटप केले.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरता महामंडळाच्या सर्व शिक्षकांनी मोठ्या धैर्याने यामध्ये सहभागी होऊन मेहनत घेतली आणि हा उपक्रम राबवला .याबद्दल महामंंडळातर्फे सर्व क्रीडा शिक्षकांचे आभार मानण्यात आले.
Comments are closed