पिंपरी : दि .२५(punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने प्रभाग क्र .८ मधील गवळीमाथा येथील अनुकुल चौक या रस्त्यावरील १४ अनधिकृत टप-या व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

शहरातील रस्तावरील अतिक्रमण निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी व अतिक्रमण पथकाच्या झालेल्या बैठकीत दिल्या होत्या . त्यानुसार क क्षेत्रिय कार्यालयाचे सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे व भोसरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रदिप पाटील , पोलिस निरिक्षक जाधव , सहा . पोलिस निरिक्षक घिघे , व सहा . पोलिस निरिक्षक रत्नपारखी यांच्या पथकाने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केली . या पथकामध्ये क क्षेत्रिय कार्यालय व इ क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण पथकाचे अतिक्रमण निरिक्षक बाळासाहेब कार्ले , अतिक्रमण निरिक्षक काळे एल.एम. व बीट निरिक्षक शिरसाट एस.डी यांच्यासह १० अतिक्रमण मजूर , २० पोलिस कर्मचारी , १५ होमगार्ड व ०२ जेसीबी , इतर यंत्रसामुग्रीच्या मदतीने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली .

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!