पिंपरी,दि.३ (punetoday9news ):-  पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आयोजित टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या निमित्ताने खेळाडूंना शुभेच्छापर “गाथा महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक वीरांची “या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात करण्यात आले होते.

या वेळी बाळकृष्ण अकोटकर आणि मारुती आडकर या माजी ऑलिम्पिक खेळाडूंचे सत्कार केंद्रप्रमुख मनोज देवळेकर व शहर अध्यक्ष अंगदराव गरड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महासंघांचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, मिलिंद क्षीरसागर, चांगदेव पिंगळे, कविता आल्हाट, भगवानराव सोनवणे, शेखर कुलकर्णी, अनिल नाईकरे,सत्यवान वाघमोडे,राजेंद्र महाजन,रामेश्वर हराळ, लक्ष्मण माने, साहेबराव जाधव, जीवन सोळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक शहर अध्यक्ष अंगदराव गरड तर आभार सचिव सत्यवान वाघमोडे यांनी व्यक्त केले. सुरुवातीला ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील अध्ययावत सभागृहात भारत विरुद्ध बेल्जीअम हॉकी सामना शेकडो क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन दाखविण्यात आला. महाराष्ट्रातील सहभागी आठ खेळाडूंची सचित्र माहिती पि.पि.टी द्वारा दाखवण्यात आली.

सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी बोलताना बाळकृष्ण अकोटकर आणि मारुती आडकर यांनी ऑलिम्पिक मधील खडतर अनुभव सांगितले.ते म्हणाले – स्पर्धेत आत्मपरीक्षण केले पाहिजेत. आपले प्रतिस्पर्धी करू शकतो तर आपण का नाही करू शकत याबाबतीत आत्मचिंतन केले पाहिजेत.  चरित्र स्वच्छ असले पाहिजे. ज्ञान आत्मसात केले पाहिजे तर ऑलिंपिकमध्ये सहभागी होवू शकू आणि जिंकू शकू. या वेळी महासंघाच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांच्या नेमणूकीच्या पत्रांचे पाहुण्याच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

 

 


Comments are closed

error: Content is protected !!