पिंपळे गुरव,दि.१५ ( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील एम्. जी . देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलीत ब्रिलीयंट स्टार प्री स्कूलमधे स्वतंत्र भारताचा ७५ वा स्वातंत्र दिन सोहळा उत्साहात पार पडला .
संस्थेचे संस्थापक रामदास देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले . याप्रसंगी संचालिका शांताबाई देवकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, पांडुरंग मिंढे, महाराष्ट्र राज्याच्या पोस्ट विभागाचे रिजनल सेक्रेटरी देवदास देवकर, आदर्श शिक्षक नवनाथ देवकर, अक्षय मिंढे, सरस्वती देवकर व पालकवर्ग उपस्थित होते
या अमृत महोत्सवी सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी केले.
Comments are closed