पुणे, दि.३०(punetoday9news):- गुरूवार दि. २ / ०९ /२०२१ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग , रॉ वॉटर पंपींग , वडगाव जलकेंद्र , तसेच लष्कर जलकेंद्र , एस.एन.डी.टी / वारजे जलकेंद्र , नवीन होळकर भामा आसखेड , चिखली रावेत पंपींग येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पपींगचे अखत्यारीतील संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवार दिनांक ३/०९/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे .
पाणी पुरवठा बंद असणारा भाग पर्वती जलकेंद्र भाग ( पर्वती , पद्मावती , इंदिरानगर पंपींग ) – शहरातील सर्व पेठा , दत्तवाडी परीसर , राजेंद्रनगर , लोकमान्य नगर , डेक्कन परिसर , शिवाजी नगर परिसर , स्वारगेट परिसर , पर्वती दर्शन , मुकुंद पर्वती गाव , सहकार नगर , सातारा रोड परीसर , पद्यावती , बिबवेवाडी , तळजाई , कात्रज , धनकवडी , इंदिरानगर परीसर , कर्वे रोड ते एस . एन . डी . टी . परीसर , एरंडवणा , संपूर्ण कोथरूड परिसर , डहाणूकर कॉलनी , कर्वेनगर , लॉ कॉलेज रोड , सेमिनरी झोन वरील मिठानगर , शिवनेरी नगर , भाग्योदय नगर , ज्ञानेश्वर नगर , साईबाबा नगर , सर्व्हे नं ४२,४६ ( कोंढवा खुर्द ) इत्यादी परीसर , पर्वती टँकर भरणा केंद्र , पद्मावती टँकर भरणा केंद्र . वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे , आनंदनगर , वडगाव , धायरी , आंबेगावपठार , दत्तनगर , धनकवडी , कात्रज , भारती विद्यापीठ परीसर , कोंढवा बुद्रुक इत्यादी . चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर : -पाषाण , औंध , बोपोडी , खडकी , चतुःशृंगी परिसर , गोखले नगर , जनवाडी , रेंजहिल्स , बावधान , बाणेर , चांदणी चौक इ . परिसर किष्किंदा नगर , रामबाग कॉलनी , डावी उजवी भुसारी कॉलनी , धनंजय सोसायटी , एकलव्य कॉलेज परीसर , महात्मा सोसायटी , गुरू गणेशनगर , पुणे युनिर्व्हसिटी परीसर , वारजे हायवे परीसर , वारजे माळवाडी , रामनगर , अहिरेगाव , पॉप्लयुलर नगर , अतुल नगर , शाहु कॉलनी , वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर , औंध बावधन , सुस , सुतारवाडी , भुगाव रोड परीसर इत्यादी . लष्कर जलकेंद्र भाग : – लष्कर भाग , पुणे स्टेशन परीसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता , रेसकोर्स परीसर , वानवडी , कोंढवा , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , मुंढवा , महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी , चंदन नगर , खराडी , सोलापूर रस्ता , गोंधळे नगर , सातववाडी इत्यादी . नवीन होळकर व चिखली पंपींग भाग : – विद्यानगर , टिंगरे नगर , कळस , धानोरी , लोहगाव , मुळा रोड इत्यादी . भामा आसखेड जलकेंद्र परिसर : – लोहगाव , विमाननगर , वडगाव शेरी , कल्याणीनगर , विश्रांतवाडी , फुलेनगर , येरवडा इत्यादी
तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .
Comments are closed