मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन , मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी , मास्टर ऑफ आर्किटेक्चर , मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन , बॅचलर ऑफ आर्टस , बॅचलर ऑफ सायन्स , बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा १५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत .

मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन , मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि . 16,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत .

बॅचलर ऑफ इंजिनिअरींग / टेक्नॉलाजी ( B.E / B.TECH ) , बॅचलर ऑफ फार्मसी ( B.Pharm / Pharm.D ) , ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि . 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या दरम्यान होणार आहेत .

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी , मास्टर ऑफ एज्युकेशन , बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन , बॅचलर ऑफ लॉ ( 5 वर्ष ) , बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि . 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत .

बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि .4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत . तसेच बॅचलर ऑफ लॉ- ( 3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021 , बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल , या परीक्षा दि . 6 व 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत .

बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि . 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत , अशी माहिती  सामंत यांनी दिली .

या परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल . हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल .

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘ गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे ‘ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून रु .8 लाख इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतला आहे , असेही सामंत यांनी सांगितले .

राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे . अशी माहितीही यावेळी देण्यात आली .

 

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

Comments are closed

error: Content is protected !!