पुणे, दि.1 ( punetoday9news):-  कोविड संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोविड मार्गदर्शक सूचना आणि त्या अनुरूप वर्तणुकीची माहिती देण्यात यावी, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांना सुचना द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना मास्क घालणे, शारिरीक अंतराचे पालन करणे आणि कोविड संसर्गापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत सातत्याने माहिती देण्यात यावी. वर्गातील बैठक व्यवस्थेतही शारिरीक अंतराचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. येत्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांकडूनदेखील मास्कचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!