पुणे, दि. 6(punetoday9news):- नवीन शिकाऊ लायसेन्स विषयक कामकाजासाठी आवश्यक असणारे नमुना १(अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी युजर आयडी घेण्याकरिता ३१ऑक्टोंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

किमान एमबीबीएस व त्यावरील वैद्यकीय पदवी धारण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत डॉक्टरांनी पदवी प्रमाणपत्र, मेडीकल कॉन्सील ऑफ इंडियाचे नोंदणी प्रमाणपत्र, दवाखान्याचे दोन फोटो, आधार कार्ड, मोबाइल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती विहीत नमुन्यात कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९ डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे ४११००१ पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!