पिंपरी,दि.२५( punetoday9news):- सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ,चिंचवडगाव यांच्या वतीने ‘कृतज्ञाता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उद्योजक सुरेश सेठिया , उद्योजक धनेश धाडीवाल, क्रस्ना डायगनोस्टिक चे संचालक राजेंद्र मुथा, आस्था हँडीक्राफ्ट्स चे पराग कुंकुलोळ, युवा उद्योजक निखिल लुणावत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिंचवड मधील कल्याण प्रतिष्ठाण (सुखी भवन) येथे ‘आनंद दरबार ‘सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
संघाचे अध्यक्ष अशोक बागमार, सचिव नंदकुमार लुणावत, राजेंद्र जैन, आर.के.लुंकड, संतोष धोका, वीर विशाल अध्यक्ष मयूर शिंगवी, सचिन धोका, रमेश धाडीवाल, गणेश चोरडिया, माणिकचंद कुंकुलोळ, हेमंत गुगळे, राजेंद्र कोटेचा, यांच्यासह संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
जैन श्रमण संघीय युवाचार्य प.पु.महेंद्र ऋषीजी म.सा, हितमीत भाषीय हितेंद्र ऋषीजी, उप प्रवर्तिनी सन्मतीजी म.सा.आदि साध्वी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
समाजातील अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपत आप आपल्या परीने नेहमीच योगदान दिले आहे. या सर्वांचा हा सन्मान असल्याचे युवाचार्यजींनी सांगितले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी हितेंद्र ऋषीजी म.सा.यांच्या जन्मदिवसानिमित्त संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचा जीवन प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्यात आला.
नवनीत बोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशोक चोरबोले,वसंत मुथा, धनराज भांडरी, धनंजय लुंकड, आनंद मुथा यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले.
Comments are closed