पिंपरी, दि. १०( punetoday9news):-  राज्य शासनाने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मागण्या कराव्यात, तसेच आत्महत्या करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पन्नास लाख आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी चे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात म्हणुन पिंपरी चिंचवड वल्लभ नगर आगार येथे एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालु आहे, संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सुचनेवरून या आंदोलन स्थळी आज संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे व संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भेट दिली व एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी सहभाग झाले.

आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांना खाजगी वाहनांला परवानगी दिली असून  एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर चर्चा करण्यास त्यांना वेळ नाही, तसेच आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, यावरून राज्य सरकारचा एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला दुट्टपी पणा समोर येत आहे, राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या तसेच निलंबित केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अन्यथा राज्य सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा देण्यात आला.

एस टी कर्मचाऱ्यांना आणि जनतेलाही टोकाचे पाऊल उचलायला लावू नये, ही संभाजी ब्रिगेड ची विनंती आहे, यावेळी आंदोलन स्थळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उपाध्यक्ष रणजित बिराजदार, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, महिला आघाडी जिल्ह्याध्यक्षा मोहिनी रणदिवे, संध्या माने, विजय कदम, सचिव निलेश ढगे, सरचिटणीस सनी उर्फ बाळू थोपटे, तालुकाध्यक्ष शिवाजी पावर, जिल्हाकार्याध्यक्ष साजिद सय्यद, तसेच एस टी कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात-

 

 


Comments are closed

error: Content is protected !!