मुंबई, ( punetoday9news):- एअरटेलनं प्रीपेड प्लॅन्समध्ये 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता रिचार्ज साठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
भारती एअरटेलनं आपल्या प्रीपेड युजर्सला मोठा हा एक धक्का दिलाय. एअरटेलनं आपल्या 20 रुपयांपासून 501 रुपयांपर्यंतच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये तब्बल 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना महागाईची झळ बसणार आहे. नवीन दरवाढ 26 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहे. याआधी जुलै महिन्यात एअरटेल कंपनीने पोस्टपेड प्लॅन्समध्येही दरवाढ केली होती.
सर्वसामान्यांना परवडणारा 79 चा प्लॅन आता 99 रुपयांना –
आता 28 दिवसाच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 99 रुपयांपासून सुरु होणार आहे. याआधी हा प्लॅन 79 रुपयांना होता. यामध्ये 25 टक्केंनी वाढ करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 99 मिनिटांच्या टॉकटाइमसह 200 एमबी डेटा मिळतोय. कंपनीने जुलै महिन्यात 49 रुपयांचा प्लॅन बंद केला होता. 99 रुपयांच्या या प्लॅनमध्ये एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही.
तसेच इतरही प्लॅन मध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वाढत्या रिचार्जच्या किंमतीने दोन सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना फक्त इनकमिंग साठीही अधिकचे पैसे दयावे लागणार. त्यामुळे एकपेक्षा अधिक सिमकार्ड वापर कमी होण्याचीही शक्यता आहे.
Comments are closed