मुंबई,दि.२६( punetoday9news):- विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मूदत होती, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत होत्या. अखेर तीन वाजपेर्यंत राजकीय तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला, त्यानुसार विरोधी अर्ज मागेही घेतले गेले. मात्र दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होत आहे.
सहा पैकी बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे. तर, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशीम-बुलडाणा येथे शिवसेना विरुद्ध भाजपा लढत होत आहे.
कोल्हापूरमध्ये भाजपा उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सोपा झाला आहे. धुळ्यात भाजपाचे अमरिश पटेल हे बिनविरोध होत आहेत. याशिवाय, मुंबईमधील बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजपाचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागलेली आहे. तर, नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे आमनेसामाने आहेत.
याचबरोबर, अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात भाजपाकडून वसंत खंडलवाल आणि महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया हे निवडणूक रिंगणात आहेत. आमदार गोपीकिश बाजेरिया हे आतापर्यंत तब्बल तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.
Comments are closed