पिंपरी, दि. ९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे देशाचे संरक्षण मंत्री जनरल बिपिन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
काल जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी, सैनिक सहकारी अशा एकूण १३ जणांचा तमिळनाडूत उटीजवळील कुन्नुर मध्ये हेलिकॉप्टर अपघात होऊन दुःखद निधन झाले. त्यामुळे ओम साई फाउंडेशन व श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार घालून व मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्याप्रसंगी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की, “बिपिन रावत यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व दिले आहे त्यांनी पाकिस्तान व चीन बरोबर जे जे युद्ध झाले त्या सर्व युद्धातही मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या देशसेवेमुळे भारताच्या संरक्षण दलाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल.”
त्यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, रवींद्र बाईक, राजू आवळेकर, कृष्णा शिंदे, श्री.भैरवनाथ जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष मल्हारराव येळवे, कार्याध्यक्ष जालंदर दाते, उपाध्यक्ष बबन रावडे, सचिव श्रीनिवास पानसरे, प्रकाश बंडेवार, रमेश तांबे, मंगला हसबनीस आदि उपस्थित होते.
Comments are closed