पुणे,दि. ३( punetoday9news):- जाणीवपुर्वक षडयंत्र रचून चारित्र्यहननाच्या ‘किटाळा’तून यशस्वी बाहेर पडण्यासाठी करावा लागणाऱ्या संघर्षा सोबतच पोलिस यंत्रणा, कारागृह व्यवस्थापण आणि न्याय व्यवस्थे विषयी अनुभवलेले जळजळीत सत्य उपराकार लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून मांडले आहे.
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते किटाळचे प्रकाशन करण्यात आले. पुण्यातील पत्रकार भवन यथे पार पडलेल्या कार्यक्रमला माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, मेहता प्रकाशनाचे अखिल मेहता, लक्ष्मण माने यांचे कुटुंबीय, वाचक, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. बाबा आढाव म्हणाले, “विमुक्त जाती भटक्या जमाती मधील माणूस एवढा पुढे गेलेला पाहून अनेकांच्या मनात जळजळ निर्माण होते. एखाद्या सोबत किती वाईट वागायचे की त्याचे जगणे मुश्कील करून ठेवले जाते. लक्ष्मणने हे सगळ लिहून ठेवलं. त्याचं काम संपल आता याला पुढ घेऊन जाण्याच काम आपलं आहे.”
निखील वागळे म्हणाले, “किटाळ म्हणजे एका लेखकाचा, कार्यकर्त्याचा, नागरिकाचा व्यवस्थे विरुद्धचा आक्रोश आहे. जेव्हा एखाद्याला भष्ट्राचार, फसवणूकी अशा कशातूनही संपवता येत नाही. तेव्हा त्याचे चारित्र्यहनन करून त्याला संपविण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी साहित्यातील एका लेखकावर बलात्कारासाखा आरोप होतो आणि त्यातून तो पुन्हा उभा राहतो हा त्याचा पुर्नजन्म आहे. माने यांच्यावर त्यावेळी ज्या महिला संघटना त्याच्या कार्यकर्त्या संपुर्ण प्रकरणाची शहानिशा न करता आरोप केले. त्यांनी आता जाहिरपणे याची माफी मागितली पाहिजे. बलात्काराच कायदा महिलांच्या बाजूनचे असायला हवा. परंतु, महिलांचाच वापर करून कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे. ” अशी मागणी निखील वागळे यांनी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता माने यांनी मानले.
अरुण खोरे म्हणाले, लक्ष्मण माने यांच्यावर झालेल्या आरोपानंतर समाजवादी चळवळीतील अनेक मित्र कार्यकर्ते त्यांच्या विरोधात उभे राहिले ही अतिशय दुःख बाब आहे. हे कोणाच्याही वाट्याला येऊ नये.” “लक्ष्मण माने यांचे किटाळ वाचून अस्वस्थ झालो. स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचार मनात येईपर्यंत त्या माणसाला त्रास दिला जातो हे अतिशय दुर्दैवी आहे.”
हागंदारीतून उठून भटक्या विमुक्त जमातीमधील सर्व सामान्य माणूस ‘पद्मश्री’च्या सन्मानापर्यंत पोहचतो. आणि त्याला जाणीवपुर्वक एवढा खाली खेचला जाती की तो पुन्हा हागंदारीत जाऊन बसेल. असा हा संपुर्ण प्रवास आहे. माझ्यावर झालेले आरोप आणि न्यायालयाने दिलेला सविस्तर निकाल हे सर्व या पुस्तकामध्ये देण्यात आला आहे. मरणाला कवटाळण्याचा विचार अनेकदा येऊन गेलेल्या या संघर्षाचे कडू अनुभव या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहेत.
– लक्ष्मण माने, लेखक
Comments are closed