पिंपळे गुरव,दि.१९ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नवी सांगवी येथील संविधान चौकामध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये संविधान चौकातील मजूरनाक्यावर रोजीरोटी मिळविण्यासाठी मेहनत करणाऱ्या कष्टकरी कामगारांसमवेत बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने कामगारांना बाबासाहेबांच्या विचारांची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली तसेच त्यांना फळे व नाश्ता वाटण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत, सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला.

या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे प्रतिनिधी संजय मराठे म्हणाले आज आपण शिक्षण न घेतल्या मुळे आपल्यावर ही परिस्थिती ओढविली आहे.परंतु येणाऱ्या पिढी ही सुशिक्षित झाली पाहिजे याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे.कष्टकरी कामगारांसाठी ‘इन्शुरन्स असतो’ या संकल्पनेवर आधारित माहिती देण्यात आली. कामगारांमध्ये आर्थिक सुरक्षा आणि विम्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे समाजातील सर्व थरांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक साक्षरता पोहोचवणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे प्रतिनिधी संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जंगम, उद्योजक शैलेश थोरात, राम मगर, विशाल धुमाळ, तुषार जांगर, संतोष भालेराव, अर्जुन पुरी, अनिल मिसाळ, अक्षय नांगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!