पिंपरी : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन व पिंपरी चिंचवड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पंधरावी राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धा 2025 दिनांक 27,28 ऑक्टोबर रोजी एच.ए. स्कूल पिंपरी येथे संपन्न झाली.

या स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड डॉजबॉल असोसिएशन व पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने केले होते. महाराष्ट्रातून तब्बल 36 जिल्ह्यांमधून 600 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होते. अतिशय चुरशीच्या सामन्यात मुलांमधून प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड संघाला मिळाला,द्वितीय क्रमांक ठाणे संघाला तर तृतीय क्रमांक जळगावच्या संघाला मिळाला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक पुणे सिटी,द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड आणि तृतीय क्रमांक मुंबई उपनगर संघाला मिळाला. पिंपरी चिंचवड असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केलेले होते आणि विजेता संघ पिंपरी चिंचवडचाच असल्याने शहरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.. या कार्यक्रमाच्या पारितोषिक या समारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे (महासचिव महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशन) शरदचंद्र धारूरकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ) अशोक पलांडे (उपाध्यक्ष डी इ एस पुणे) कैलास कदम (कामगार नेते )सद्गुरु कदम (नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका) राहुल जवळकर,संतोष भाऊ कांबळे, वैशाली जवळकर,आदेश नवले, गणपतराव बालवडकर, कमलाकर डोके,प्रसाद दोमाले, नितीन कदम पाटील, गिरीश पाटील,निलेश गवांदे, प्रदीप साखरे,दीपक कन्हेरे,क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे,सुनील शिवले,अलका सरग पोलीस निरीक्षक पुणे शहर ,राजेश माघाडे, मुख्याध्यपिका दर्शना कोरके, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष सत्यवान वाघमोडे,कार्याध्यक्ष मुकेश पवार,सचिव रामेश्वर हराळे,उपाध्यक्ष सचिन नाडे, सहसचिव जीवन सोळंके तसेच चंद्रशेखर कुलकर्णी,भगवान सोनवणे,मिलिंद माथने,शिवाजी बांदल,शेखर कुदळे, भटू शिंदे,साहेबराव जाधव, श्रीकांत देशपांडे,मधुकर रासकर, विजय टेपागुडे, संकेत साळुंखे,दळवी सर,डॉ. सुवर्णा घोलप, सुषमा पवार,सुजाता चव्हाण, भावना पायमोडे यांनी केले.यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विजेता संघाचे सर्व मान्यवरांनी ट्रॉफी देऊन सन्मान केला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलींमधून मानसी चव्हाण तर मुलांमधून सुरज ढमढेरे यांचा सन्मान करण्यात आला.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!