सांगवी : सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पीडब्ल्यूडी मैदान- जुनी सांगवी पोलीस चौकी- माकन चौक माहेश्वरी चौक- साई चौक- कृष्णा चौक – क्रांती चौक- साई चौक मार्गे ते पीडब्ल्यूडी मैदान अशा पद्धतीने एकता दौड (रन फॉर युनिटी ) चे आयोजन करण्यात आले .

या एकता दौडमध्ये विवेक पाटील (पोलीस उपयुक्त वाहतूक), जितेंद्र कोळी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), अमोल नांदेकर (पोलीस निरीक्षक, शंकर जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ) , शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, महिला दक्षता कमिटी पोलीस मित्र, ज्येष्ठ नागरिक, करीम इनामदार मदरसा, राजीव गांधी नगर, अजित सिरगुपी मदिना मस्जिद पिंपळे गुरव विद्यार्थी व नागरिक मिळून 600 सदस्य सहभागी झाले होते.
 
  
  
  
 
 
                         
                      
Comments are closed