भोरवाडी कोळविहिरे येथे गुरुकुल विद्यार्थ्यांचे मातृभूमी परिचय शिबिर उत्साहात संपन्न.

निसर्गाच्या कुशीत आणि मंदिरांच्या गाभाऱ्यात ५वी चे शिबिर झाले पुरंदर आणि कर्हेच्या खोऱ्यात !

पुरंदर :  पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र गुरुकुल च्या इ. ५वी च्या विद्यार्थ्यांचे मातृभूमी परिचय शिबिर भोरवाडी, कोळविहिरे, तालुका पुरंदर येथे दिनांक २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपन्न झाले. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाची ओळख करून देणे. तिथली संस्कृती, ऐतिहासिक परंपरा, भौगोलिक वैशिष्ट्ये, सामाजिक परिस्थिती यांची ओळख करून देणे. गावातील विविध उद्योग, त्या परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देणे. शेतीमधील श्रमदान, गोसेवेचा अनुभव देणे. ह्या उद्दिष्टांना घेऊन ५० विद्यार्थी आणि ६ अध्यापक गावामध्ये आले होते. मंदिर भेटी, काकड आरती, कीर्तन, अनेक क्षेत्रभेटी, व्यक्तिपरीचय, गावभेटी घेत घेत या विद्यार्थ्यांनी शिबिराचा सुंदर अनुभव निसर्गाच्या सानिध्यात घेतला.

काल दिनांक २ नोव्हेंबर रोजी सरपंच मीना झगडे, माजी सरपंच बापू भोर, आबा घाटे, खंडोबा देवस्थान चे विश्वस्त मंगेश घोणे, मयूर गुरव, अर्जुन भोर या मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. आपल्या देशाची परंपरा, संस्कृती टिकवून ठेवणे पुढच्या पिढीच्या हातात आहे आणि त्यासाठी ज्ञान प्रबोधिनी शाळा उत्तम काम करत असल्याबद्दल आबासाहेब घाटे यांनी शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

देशाची सेवा करण्यासाठी संकटांना पाठ न दाखवता त्यांना निडर होऊन सामना करा असा संदेश सुभेदार भोर यांनी दिला.

शिबिरादरम्यात प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि मार्गदर्शन केले. योगिनी कुलकर्णी, श्रीराम इनामदार, शिल्पा देशपांडे, मंजुषा देशमुख, आनंद बिराजदार, अशोक कामथे, कल्याण गरडे हे अध्यापक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. भोरवाडीतील सचिन यादव व सुभाष यादव या बंधूंच्या वाड्यामध्ये विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था केली होती.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!