चिंचवड (प्रतिनिधी ):- श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ चिंचवडगाव यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना श्रावण बाळ व रायझिंग स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी जैन साध्वी व समाज बांधव उपस्थित होते.
उपप्रवर्तिने परमपूज्य चंदन बालाजी म.सा, बुलंद वाणी प.पु.पद्मावती जी म.सा यांच्या सह आदि साध्वीगण,संघाचे अध्यक्ष अशोक बागमार,नंदकुमार लुनावत ,राजू मुथा यांच्या उस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारा युवा लेखक, कवी प्रेम कुंकुलोळ याला रायझिंग स्टार , साधू साधवेंसाठी विहार सेवा देणाऱ्या रश्मी बोरा हिला रायझिंग युवती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ठ महिला संघटन व धार्मिक कार्यक्रम बद्दल सुनीता गुगळे यांना रायझिग लेडी पुरस्कार देऊन सन्मानित केले. आई वडिलांच्या सेवे बद्दल दर्शन नहार व प्रणिता नहार यांना श्रावण बाळ पुरस्काराने गौरविण्यात आले शाल सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.अध्यक्ष अशोक बागमार,दिलीप नहार, जैन कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष प्रा. अशोक पगारिया, स्वागताध्यक्ष धर्मेंद्र मुथा नवनीत बोरा,रमेश धाडीवाल,हेमंत गुगळे, आहे मयूर शिंगवी,सचिन धोका,मनोज बाफना, यांच्या सह संघाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संखेत उपस्थित होते.स्वेता बागमार यांनी सूत्रसंचलन केले.नंदकुमार लुनावत यांनी आभार मानले.

पुणे, पिंपरी चिंचवड म्हाडा घर अर्जास मुदतवाढ. येथे करा अर्ज.
राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धा २०२५ संपन्न.

Comments are closed