पिंपरी : – विनियार्ड वर्कर्स चर्च, दापोडी येथे प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ मोठ्या भक्तिभावाने व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी दापोडी येथील चर्च परिसर आकर्षकरीत्या सजवण्यात आला होता. प्रार्थना, कॅरोल गीतगायन आयोजित करण्यात आले होते.
चर्चचे संस्थापक बिशप पीटर सिल्वे आणि पास्टर जयश्री सिल्वे यांनी नाताळ हा देवाच्या प्रेमाचा, आशेचा आणि शांततेचा संदेश देणारा उत्सव आहे, जो येशू ख्रिस्ताच्या जन्मातून मानवजातीला प्राप्त झाला आहे.

मध्यरात्रीच्या विशेष नाताळ उपासनेला हजारो भाविक उपस्थित होते. चर्चच्या परंपरेनुसार सर्व दिवे बंद करून जवळपास दहा ते बारा हजार भाविकांनी हातात मेणबत्त्या प्रज्ज्वलीत करून ज्यातून येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे हे प्रतीकात्मकरीत्या दर्शविले. यावेळी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता. दरम्यान, विशेष प्रार्थना सभा पार पडली. त्यानंतर बिशप पीटर सिल्वे यांनी नाताळचा खास संदेश दिला. येशू ख्रिस्ताचे जीवन व संदेश उलगडून दाखवणारे नृत्य व नाट्यछटा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव व नागरिक उपस्थित होते.

Comments are closed