पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, उद्योजक अरुण पवार, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांची कन्या दिप्ती अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे यांच्या पत्नी उमा शिवाजी पाडुळे यांनी सुरू केलेल्या होम-टू-होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिसरातील विविध नगरांमध्ये जाऊन त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला.
यावेळी नागरिकांनी परिसरातील दिवसाआड पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता व मूलभूत सोयींबाबतच्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांची नोंद घेत, आजपर्यंत केलेल्या विकासकामांप्रमाणेच पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी नागरिकांना दिला.
घराघरांतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग तसेच तरुणांचा उत्साह यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरणात चैतन्य निर्माण केले आहे.
– प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी व जनतेसाठी अहोरात्र झटणारे उमेदवार म्हणून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्र. ३१ चे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आहे.
– राजेंद्र जगताप, मा. नगरसेवक

Comments are closed