आपलं एक मत , विकासाला मत.

सांगवी :- समाजाचा खरा आणि शाश्वत विकास महिलांच्या सक्षमीकरणातूनच साध्य होतो, या ठाम भूमिकेतून प्रशांत शितोळे यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सातत्यपूर्ण कार्य केले आहे. २००२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी महिला सबलीकरणाच्या दिशेने राबवलेल्या उपक्रमांनी अनेक कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

या २४ वर्षांच्या सामाजिक प्रवासात महिला बचत गटांची स्थापना करून महिलांमध्ये बचत आणि आर्थिक शिस्तीची सवय रुजवण्यात आली. महापालिका तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करण्यात आले. स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून अनेक कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली आहे.

महिलांच्या कौशल्य विकासासाठी शिवणकाम, ब्युटीपार्लर, मेहंदी व हस्तकला, खाद्यपदार्थ निर्मिती आदी विविध प्रशिक्षण वर्ग व कोर्सेस सुरू करण्यात आले. या प्रशिक्षणातून अनेक महिलांनी घरगुती उद्योग सुरू करून स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न निर्माण केले असून, स्वावलंबनाचा आत्मविश्वास मिळवला आहे.

यासोबतच महिलांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्य जनजागृती उपक्रम राबवून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणजे आज अनेक महिला स्वाभिमानी, सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक म्हणून समाजात ठामपणे उभ्या आहेत.

“महिला सक्षम तर समाज सक्षम” या विचारातून सुरू झालेला हा प्रवास पुढील काळातही अखंड सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ३२ मध्ये विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाला मतदान करून मजबूत नेतृत्वाला साथ द्यावी, असे मतदारांना आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!