• तासिका मानधनावर तज्ज्ञ शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती
पुणे : युपीएससी मार्फत होणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन-२०२६ (सीडीएस) च्या तयारीसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान (भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयावरील तज्ज्ञ शिक्षकांची ३०० रुपये प्रती तासिका मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयातील पदवी, पदव्युत्तर तज्ज्ञ प्राध्यापक असणे व स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपूर्ण कागदपत्रांसह मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन ले. कर्नल विलास शंकर सोनवणे (नि.), प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९१५६०७३३०६ किंवा ०२५३-२४५१०३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
समाजाचा खरा आणि शाश्वत विकास महिलांच्या सक्षमीकरणातून – प्रशांत शितोळे.
प्रभाग क्र. ३१ : राष्ट्रवादी काँग्रेस नवी सांगवी, विकासाचा अजेंडा.
नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या होम-टू-होम प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Comments are closed