राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणूकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर असणार आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहिर प्रचाराचा कालावधी मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाप्त होणार आहे.
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे तसेच प्रिंट मिडीयाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील. यामध्ये मेसेजिंग ॲपस् तसेच सोशल मिडीया, उदा. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इ.चाही समावेश आहे.
जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सदर साहित्य संबंधित उमेदवार /पक्षांनी तात्काळ काढून टाकणे आवश्यक राहील. जर त्यांनी असे प्रचार साहित्य जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर काढले नाही तर त्याबाबत मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून प्रचार साहित्य काढण्याकरिता आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवारांच्या खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
तरी जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही पध्दतीचा प्रचार इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीयाद्वारे करू नये व जाहिर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सर्व संबंधित राजकिय पक्ष व उमेदवार यांनी प्रचाराशी संबंधित सर्व साहित्य तात्काळ काढून टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed