शिवेंद्रराजे भोसले यांची उद्या नवी सांगवीत सभा
काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व आर.पी.आय. (आठवले) महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक २९, ३१ व ३२ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही जाहीर सभा सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता, इंद्रप्रस्थ रोड, साई चौक, नवी सांगवी, येथे होणार आहे. या सभेला पिंपरी-चिंचवडसह परिसरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार शंकर जगताप राहणार असून, महापालिका निवडणुकीतील विकासकामांचा आढावा, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन मांडण्यात येणार आहे.
भाजपा व आर.पी.आय. (आठवले) महायुतीकडून प्रभाग क्रमांक २९ मधून आंगोळकर रविना, धराडे शंकुतला, कदम शशिकांत व जगताप शाम , तर प्रभाग 31 मधून माऊली उर्फ ज्ञानेश्वर जगताप, नवनाथ जगताप, दुर्गाकौर अदियाल, पल्लवी जगताप, प्रभाग 32 मधून प्रशांत शितोळे, तृप्ती कांबळे, हर्षल ढोरे, माई ढोरे हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या प्रचाराला या जाहीर सभेमुळे अधिक गती मिळणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
एकूणच, या जाहीर सभेमुळे प्रभागातील निवडणूक प्रचाराला जोर येणार असून, निवडणुकीची रंगत अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



PCMC election 2026 उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस.

Comments are closed