नवी दिल्ली,दि.२२ ( punetoday9news):- भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू रानी रामपाल यांना मिळाला आहे.
केंद्र सरकारने आज पाच खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी, तेरा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी, सत्तावीस क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, पंधरा खेळाडूंची ध्यानचंद पुरस्कारासाठी तर आठ खेळाडूंची तेनसिंग पुरस्कारासाठी निवड जाहीर केली. अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत घोडेस्वारीसाठी अजय सावंत, कुस्तीपटू राहूल आवारे, खोखोपटू सारिका काळे, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर, पॅरास्विमिंग सुयश जाधव यांची, तर ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आदी खेळाडूंचा समावेश आहे . पुणे येथील लक्ष्य इन्ट्यिट्यूट आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट या संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.
Comments are closed