पुणे,दि.२२(punetoday9news):- जगातला इंडोनेशिया हा असा देश आहे कि इथे मुस्लीम लोकसंख्या अधिक असूनही देशातल्या नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यात आला आहे. इंडोनेशिया येथील चलन भारतातील चलनासारखेच आहे. या देशातला व्यवहार हा रुपयांमध्येच होतो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मनोरंजक माहिती आपणास हवीच.
इंडोनेशियामधील २० हजार रुपयाच्या नोटेवर समोरच्या बाजूस गणपतीचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. यासोबतच नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली होती . त्यानंतर प्रचंड विचार करुन २० हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला होता .तसेच या नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला. यावर इंडोनेशियाच्या लोकांचे असे
म्हणणे आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.
इंडोनेशिया हा जगातला असा देश आहे की त्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ८७ टक्के लोक हे मुस्लीम आहेत. तर या देशात हिंदूंचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानले जाते .
जाहिरात:-
* (आपल्या व्यवसायाची जाहिरात करा फक्त १००० रु गणेशोत्सव खास ऑफर)
9922557929
Comments are closed