पुणे,दि. २१ ( punetoday9news):-  राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत, असे मी म्हटल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मात्र, अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेट देशमुख यांनी दिली. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा इन्कार करताना देशमुख म्हणाले, एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असे कुठेही म्हटलेलो नाही. या मुलाखतीचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर  वस्तुस्थिती लक्षात येईल.

Comments are closed

error: Content is protected !!