पिंपरी,दि.१ ( punetoday9news):- कोरोना महामारीने जगात, देशात, राज्यात,शहरात, गावागावात थैमान घातले असूून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. राज्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात ही फटाके स्टॉलला फटाके विक्रीसाठी परवानगी देऊ नये व विक्रीवर बंदी घालावी. फटाक्यांमुळे जेष्ट नागरिक, लहान मुले, गरोदर महीला व कोरोना सारख्या आजारी व्यक्तीना फटाक्यांच्या प्रदूषणामुळे श्वासनाचा त्रास होतो, फुफ्फुसा संबंधीत आजारात वाढ होते. शहराच्या प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अनेक पशुपक्षांना जीव गमवावा लागलो.
सध्या कोरोना आजार शहरात आटोक्यात आणण्यासाठी कोरोना योद्धे जिवाची बाजी लावून प्रयत्न करत आहेत व त्यांना यश येताना दिसत आहे. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे ईतर आजार वाढण्याची भीती निर्माण होते. चीन सारखा विश्वास घातकी देश फटाक्यांद्धारे व ईतर वस्तूच्या माध्यमातून व्हायरस पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून फटक्याबरोबर चायनीज वस्तू वरही बंदी घालण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
संस्थाध्यक्ष विकास कुचेकर यांनी सांगितले की नागरिकांनीही फटाके वाजु नये, व्यर्थ पैशाचा अपव्यय करु नये . गरीब नागरिकांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर उपस्थित होते .
Comments are closed