मुंबई,दि.२०( punetoday9news):- महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. १९) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून कार्यरत होते.
वीजक्षेत्रातील महत्वाच्या पदांवर सुमारे ३१ वर्षांचा अनुभव असलेले संजय ताकसांडे हे सन २००३ मध्ये सध्याच्या महावितरण व तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रुजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये थेट भरती प्रक्रियेतून त्यांची मुंबई मुख्यालयात कार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रेंचाईझी या विभागांसह पश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भ विभागाचे नियंत्रणही त्यांच्याकडे होते ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रादेशिक कार्यालय अस्तित्वात आल्यानंतर  त्यांची प्रादेशिक संचालक पुणे येथे नियुक्ती झाली . एप्रिल २०१ ९ मध्ये महापारेषण कंपनीच्या संचालक ( संचालन ) पदी थेट भरती प्रक्रियेद्वारे निवड झाली व आतापर्यंत या पदावर ते कार्यरत होते .

महावितरण व महापारेषणच्या सेवेत येण्यापूर्वी ते केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण , नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , मुंबई या ठिकाणी कार्यरत होते .३१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेमध्ये विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत . त्यामध्ये विशेष करून वितरण , पारेषण , प्रणाली संचालन , मानव संसाधन , सामुग्री व्यवस्थापन , स्वंयचलन व नियंत्रण , राज्य भारप्रेषण इत्यादींचा समावेश असून या क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!