लातूर,दि.२०( punetoday9news):- लातूर मधील औसा तालुक्यात बोरफळ येथे रात्र गस्त दरम्यान एक हरीण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असल्याबाबत  पोलिसांना माहिती मिळताच असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस बाळासाहेब डोंगरे यांनी तत्परतेने कारवाई करत जखमी हरिणाचा जीव वाचवला आहे. 

 

कित्येकदा रस्त्यावर रात्रीच्या वेळी जंगली पशु-प्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेने व योग्य वेळी योग्य उपचार न झाल्याने मृत पावतात.  यामुळे आज नागरिकांमध्ये व वाहनचालकांमध्ये वन्य पशु-पक्षी याविषयीही जनजागृती करण्याची गरज आहे.

लातूर मधील खाकी वर्दीतील अनोख्या प्राणीप्रेमाणे एका मुक प्राण्याचा जीव वाचवून निसर्ग चक्रातील प्राण्यांचे महत्व अबाधित ठेवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. ही घटना माहिती मिळताच त्यांनी प्राणीमित्र सचिन क्षीरसागर यांना घटनास्थळी बोलावून घेतले व जखमी हरिणाला उपचारासाठी डॉ. कुंभारकर यांंच्याकडे  घेऊन गेेले. डॉक्टरांनी जखमी हरिणावर योग्य उपचार केले व जखमी हरिणाला योग्य वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे.

त्यानंतर वन विभागाचे वन रक्षक शेवाळे यांना संपर्क करून जखमी हरीण त्यांच्या ताब्यात दिले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!