दापोडी : दापोडी पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांच्या वतीने लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशाच्या एकात्मतेचा संदेश देणारा ‘रन फॉर युनिटी’ (Run for Unity) दौड कार्यक्रम घेण्यात आला.
दापोडी पोलीस स्टेशन शितळादेवी चौक-डॉ. आंबेडकर पुतळा- दापोडी भाजी मंडई- मुंबई पुणे रोड- विनियाड वर्क्स चर्च व पुन्हा दापोडी पोलीस स्टेशन या मार्गे एकता दौड चे आयोजन करण्यात आले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना कृतीतून उजाळा देण्यासाठी एकता व अखंडता यांची शपथ घेण्यात आली.
पुणे, पिंपरी चिंचवड म्हाडा घर अर्जास मुदतवाढ. येथे करा अर्ज.
यावेळी महादेव कोळी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) प्रदीप पाटील (पोलीस निरीक्षक) राजू भास्कर , विलास पवार, नितीन संकुन्हटे, नवनाथ पोटे, जयदीप सोनवणे, चंद्रकांत तिटकारे, वसंत दळवी, सागर जाधव, पीएसआय वंदना ठोक, पीएसआय नेहा ठोंबरे, निकिता सणस, अर्चना शितोळे , सीमा यादव, नम्रता मस्के, प्रतिभा भोसले, ऋतुजा नाईकरे, मयुरी शिंगटे , रूपाली मासाळ, मालती फलके, अस्मिता कांबळे, याबरोबर शांतता कमिटी ज्येष्ठ नागरिक संघटना इक्रा प्रशालेचे विद्यार्थी , डिफेन्स ॲकडमी , पोलीस मित्र संघटना व दापोडी बोपखेल कासारवाडी फुगेवाडी येथील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे, पिंपरी चिंचवड म्हाडा घर अर्जास मुदतवाढ. येथे करा अर्ज.
सांगवी पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी.
 
                         
                      
Comments are closed