पिंपरी :- निवडणूक आचारसंहिता काळात येणाऱ्या सार्वजनिक सणांमध्ये आचरणाबाबत राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत. राजकीय पक्षाचे नेते उमेदवार, कार्यकर्ते सण – उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. पण, या सण – उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये अथवा त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये भोजनावळी – जेवणाचे कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने महिलांना वाण देण्याच्या उद्देशाने राजकिय पक्ष, उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीने वस्तूंचे, पैशाचे वाटप करू नये. तसेच नागरिकांनी देखील या प्रलोभनाला बळी पडू नये. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरांमध्ये एकूण ३४ भरारी पथके व ३४ एसएसटी पथके कार्यरत असून या सर्वांची अशा घटनांवर २४ तास नजर राहणार आहे,अशी कोणतीही घटना होत असलेचे निदर्शनास आल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयास व संबंधित क्षेत्रीय कार्यालयात स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्षास संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!