पिंपळे गुरव, ता. (३१) :- पिंपळे गुरव येथील समाजसेविका आणि ‘पल्लवी जगताप बचत गट’ अध्यक्ष पल्लवी महेश जगताप यांनी आपला वाढदिवसाच्या साध्या आणि आदर्श पद्धतीने साजरा करत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. वैभवशाली पार्टी वा उत्सव न साजरा करता त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांना समक्ष भेटून सुपूर्द केला.
समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी आणि आपला आनंद इतरांच्या विकासासाठी वापरावा, या हेतूने त्यांनी हा उपक्रम राबवला. या प्रसंगी परिवारातील सदस्य, बचत गटातील महिला आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री सहायता निधीत दिलेल्या देणगीतून गरजू रुग्ण, शैक्षणिक अडचणीतील विद्यार्थी यांना मदत होणार आहे.
पल्लवी जगताप यांच्या या आदर्श कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून वाढदिवस साजरा करण्याचा हा एक अर्थपूर्ण आणि दखलपात्र उपक्रम ठरत आहे. सामाजिक कार्यातील त्यांचा समर्पित दृष्टिकोन अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड म्हाडा घर अर्जास मुदतवाढ. येथे करा अर्ज.
दापोडीत रन फॉर युनिटी भव्य दौड कार्यक्रमाचे आयोजन.
Comments are closed