सांगवी, दि.२९ :- सांगवीतील सांगवी विकास मंच तर्फे आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी माने, सोमनाथ कोरे, सांगवी विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
सांगवी परिसरातील तरुणांमध्ये शिवचरित्राविषयी जागरूकता आणि पारंपरिक किल्ले बांधणीची संस्कृती जपण्याचा उद्देश या उपक्रमा मागे असल्याचे ओंकार भागवत यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सांगवी विकास मंच चे कार्याध्यक्ष ओंकार भागवत यांनी केली. या स्पर्धेत एकूण ३२ मंडळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता. विजेत्यांना रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक: अभिनव तरुण मित्र मंडळ, कुंभार वाडा, द्वितीय क्रमांक: चंद्रमणी नगर मित्र मंडळ, तृतीय क्रमांक: मधुबन मित्र मंडळ (बॉईज) यांचा समावेश होता.
रुग्णाला माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा मदतीचा हात
सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप याच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ५१ हजार रुपये .
सांगवी पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी.
राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धा २०२५ संपन्न.

Comments are closed